प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या प्रादेशिक सह-सचिवपदी नियुक्ती

पालघर : 

विविध शैक्षणिक, संशोधन अथक प्रयत्नाची दाखल घेऊन आयआयएलएम विद्यापीठ, ग्रेटर नोएडा येथे आयोजित इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या १०८ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेल्या व्यास्थापकीय बैठकीत प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची १ जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२९ या कालावधीसाठी पुढील पाच वर्षांकरिता इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या प्रादेशिक सह-सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आयईएच्या शैक्षणिक उपक्रमांच्या विस्तारासाठी आणि वेळोवेळी आयोजित केल्या जाणाऱ्या आयईएच्या परिषदा, परिसंवाद आणि कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यासाठी शिक्षक आणि संशोधकांना प्रोत्साहित करण्यासाठी जबाबदारी प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांच्याकडे देण्यात आली आहे. 

प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांची इंडियन इकॉनॉमिक असोसिएशनच्या प्रादेशिक सह-सचिवपदी नियुक्ती झाल्या बद्दल महाराष्ट्रील उच्च शैक्षणिक वर्तुळातून राज्यातून अभिंदन करण्यात येत आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button