दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर उत्साहात

पालघर : 

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर दिनांक २४ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत तांदूळवाडी- उचावली येथील नाईक फाउंडेशन येथे यशस्वीपणे पार पडले. स्वयंविकास, समाजसेवा व सामाजिक जागरूकता या उद्दिष्टांसह शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या पहिल्या दिवशी स्वयंसेवकांनी परिसर स्वच्छता अभियान राबविले. दिनांक २५ डिसेंबर रोजी योगसत्राने शिबिराची सुरुवात झाली. योग प्रशिक्षणासाठी प्रा. सुरेश हसबे, प्रा. योगेश आक्रेकर व श्री महेश राऊत उपस्थित होते. त्यानंतर “अवयवदान – काळाची गरज” या विषयावर मोहन फाउंडेशनचे श्री निखिल नगरकर व प्रचिती माळी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी अवयवदानाविषयी असलेले गैरसमज दूर केले. तसेच माजी कार्यक्रम अधिकारी श्री सचिन उराडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, स्पर्धा परीक्षा व नीती आयोग यावर मार्गदर्शन केले.

दिनांक २६ डिसेंबर रोजी उचावली गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर श्री निलेश वझे, नागरी संरक्षण दल, पालघर यांचे “आपत्ती व्यवस्थापन” या विषयावर व्याख्यान झाले. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींना तोंड देण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या.

दिनांक २७ डिसेंबर रोजी उचावली गावात दोन वनराई बंधारे बांधण्यात आले. सकाळच्या सत्रात वसईच्या गोन्सालो गार्सिया महाविध्यालायाचे प्रा. जगदीश संसारे यांनी पथनाट्य सादरीकरण याविषयावर मार्गदर्शन केले. दुपारी नाईक फाउंडेशन येथे स्वच्छता व रंगकाम करण्यात आले. व्यवस्थापनाचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे, कोषाध्यक्ष मंगेश पंडित, सचिव सुधीर कुलकर्णी, सांस्कृतिक समिती कार्याधक्ष सुधीर दांडेकर, अमिताताई राऊत, सुरेश जोशी, प्राचार्य डॉ. किरण सावे, प्रा. विवेक कुडू तसेच मेघा कोरे, शैला कुलकर्णी, अस्मिता पंडित, नेत्रा सावे, समिधा कुडू यांनी शिबिरास भेट दिली. प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःशी स्पर्धा करण्याचा संदेश दिला. सांस्कृतिक समिती कार्याधक्ष श्री. सुधीर दांडेकर यांनी व्यक्तिमत्त्व विकासात वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले.

 २८ डिसेंबर रोजी तांदूळवाडी किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. दिनांक २९ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत परिसर व शाळेसमोरील भाग स्वच्छ करण्यात आला. नेत्रदान विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. “युवक आणि स्वामी विवेकानंद” या विषयावर श्री प्रशांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. ३० डिसेंबर रोजी शिबिराची सांगता झाली.

प्रा. विवेक कडू यांच्या वतीने रक्षाली धोंडे व सार्थक रोकडे यांना उत्कृष्ट स्वयंसेवकांना बक्षीस देण्यात आले. 

नितेश पागे, सचिन दिंडा व अमोल ठाकूर यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी झाले. प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य डॉ. तानाजी पोळ व डॉ. महेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. शिबिराचे आयोजन डॉ. अरुंधती बर्डे, डॉ. राजू तांडेल, डॉ. संगीता ठाकूर, डॉ. प्रकाश घरत, प्रा. नेहा उराडे व प्रा. ध्रुविका सावे यांनी केले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button