नावझे येथे महिला व मुलांचा आनंद बाजाराचा कार्यक्रम

)

पालघर : 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत ग्रामपंचायत नावझे येथे जिल्हा परिषद शाळा नावझे येथे महिला व मुलांचा आनंद बाजाराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी महिलांनी व मुलांनी विविध खाद्यपदार्थ ,भाजीपाला व वस्तू विक्रीसाठी आणण्यात आल्या होत्या व त्या आनंद मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ, ग्रामीण विद्यालय नावझेचे विद्यार्थी, शिक्षक सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी बाजाराचा आनंद घेतला त्यामुळे देवाणघेवाण्याची संधी मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा महिला व मुलांना झाला असेच विविध कार्यक्रम ग्राम पंचायती मार्फत राबविण्यात येतात व गावातील सर्व लोकांना एकत्रित येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व रोजगाराची संधी सुद्धा त्यामधून उपलब्ध होते सदरच्या उपक्रमासाठी सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, गावातील सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामस्थ ,महिला बचत गट ,अंगणवाडी कार्यकर्ती, आशा ,मुली, मुले,ग्रामपंचायत सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button