पालघरमध्ये संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ तीन दिवसीय धार्मिक कार्यक्रम

पालघर : मंगेश तावडे

पालघर विष्णू नगर येथे संत वामनभाऊ महाराज व संत भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणार्थ २१ वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा गुरुवार १ जानेवारी २०२६ ते रविवार ४ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक ०१ जानेवारी रोजी कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, बाबांच्या प्रतिमेचे अभिषेक, दीप प्रज्वलन, होम-हवन व वीणा पूजन होणार आहे. त्यानंतर दररोज नामवंत कीर्तनकार व प्रवचनकारांच्या उपस्थितीत कीर्तन, प्रवचन, भजन व हरिपाठ असे कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत महाराष्ट्रातील विविध भागातून आलेले कीर्तनकार आपली कीर्तनसेवा सादर करणार असून, महिला भजनी मंडळे तसेच वारकरी संप्रदायातील भजन मंडळांचे भजन-कीर्तन भाविकांना श्रवणसुख देणार आहे.

 गुरुवारी रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत हभप डॉक्टर हरिदास महाराज पालवे शास्त्रीजी श्री क्षेत्र आळंदी देवाची यांचे कीर्तन होणार असून दुपारी 2.30 ते 4:30 पर्यंत रवींद्र शिरसाठ महाराज, विजयानंद शास्त्रीजी महाराज दहिवेलकर, मुरलीधर शिरसाठ आणि ह भ प प्राध्यापक कोळी सर यांचे प्रवचन होईल. सायंकाळी पाच ते सहापर्यंत गंगा माता भजनी मंडळ विष्णूनगर, समस्त वारकरी भजनी मंडळ धनानीनगर बोईसर, श्री. ल. ना. भजनी मंडळ टेंभोडे, श्री कलंकी केशव भजनी मंडळ सरपाडा उमरोळी, श्री संत माऊली हरिपाठ महिला भजनी मंडळ विष्णू नगर यांची भजन, जागरण होणार आहे. शुक्रवार दिनांक 2 जानेवारी रोजी ह भ प लक्ष्मण महाराज कराड श्री क्षेत्र क्षेत्र अंजनीगड डोंगरवाडी जिल्हा अहिल्यानगर वेळ रात्री नऊ ते अकरापर्यंत कीर्तन, दुपारी 2 ते 3 तीन पर्यंत श्री संत माऊली हरिपाठ महिला भजन मंडळ विष्णू नगर, दुपारी तीन ते 4.30 पर्यंत प्राजक्ता उकिरडे बढे (संगीत विशारद) यांचे प्रवचन, सायंकाळी पाच ते सहा वाजता भजनी मंडळाचा जागर, शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी ह भ प प्रदीप महाराज पाटील वासरेकर (बोईसर) यांचे रात्री नऊ ते अकरा वाजेपर्यंत कीर्तन, सामूहिक भजन सकाळी दहा ते साडेबारा, सायंकाळी पाच ते सहा भजनी मंडळाचा जागर होणार आहे.शनिवार दिनांक ०३ जानेवारी रोजी दुपारी दिंडी मिरवणूक काढण्यात येणार असून, विठ्ठल-नामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसमय होणार आहे. तसेच रविवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता गुरुवर्य महंत शास्त्री ब्रह्म परमपूज्य हभप आदिनाथ महाराज शास्त्रीजी यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी भंडारा होणार आहे. 

रविवार दिनांक ०४ जानेवारी रोजी सकाळी गुरुवर्यांच्या उपस्थितीत महाअभिषेक, कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद (भंडारा) आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आयोजकांनी कळविले आहे. हा पुण्यतिथी सोहळा श्री संत भगवान बाबा सेवा मंडळ, विष्णुनगर, पालघर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला असून, कार्यक्रमाचे स्थळ विष्णुनगर, पालघर, जिल्हा पालघर असे आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button