वाडा एसटी आगारात शिवजयंती उत्सव साजरा 

 वाडा : महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वाडा एस. टी. आगारमध्ये धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. राजेश पाटील यांचे शिवव्याख्यान आयोजित केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच काम केले पाहिजे तरच महाराजांनी जसे स्वराज्य निर्माण केले होते तसा महाराष्ट्र घडेल. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेल्या कठीण प्रसंग व त्यातून त्यांनी कसे मार्ग काढले त्या प्रसंगाचे वर्णन आपल्या व्याख्यानात केले.

या कार्यक्रमात वाडा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांची मुलेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने गुणगान गायले. वाडा उपनगराध्यक्ष देहरकर, बांधकाम सभापती अजिंक्य पाटील, नगरसेवक सुचिता पाटील, विराज पाटील, भूपेश जगताप, सविता वनगा, आगार व्यवस्थापक भूपेन बेंद्रे, वाहतूक निरीक्षक रघुनाथ मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी चालक शरद बोराडे, राहुल देशमुख, सुधाकर गावडे, गणेश आठरे, उमेश वलटे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

Reporter By Rupesh Mokashi, Wada

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button