पालघर जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद – भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत

डहाणू, पालघर, जव्हार आणि वाडा येथील गटनेत्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र सुपूर्द

पालघर : मंगेश तावडे

भारतीय जनता पक्षाने पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली संघटनात्मक ताकद अधिक बळकट करत डहाणू, पालघर, जव्हार आणि वाडा या चार नगरपरिषदांतील गटनेत्यांची अधिकृत घोषणा केली. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आले.

भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पालघर जिल्ह्यात भाजप हा सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारा एक नंबरचा पक्ष ठरला आहे.” डहाणू नगरपरिषदेत भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून, जव्हार आणि वाडा येथे भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात यश आले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

गटनेत्यांच्या घोषणेनंतर पालघर येथे चारही गटनेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास भाजप जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्यासह आमदार हरिश्चंद्र भोये, ज्येष्ठ नेते बाबाजी काठोले, भाजप सरचिटणीस सुशील औसरकर, वाडा नगराध्यक्ष रिमा गंधे, जव्हार नगराध्यक्ष पूजा उदावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले गटनेते –

🔹 पालघर : भावानंद संखे, 

🔹 डहाणू : जगदीश रजपूत, 

🔹 जव्हार : कुणाल उदावंत,

🔹 वाडा : रामचंद्र भोईर या सर्व गटनेत्यांचा भाजपच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास पालघर नगराध्यक्षपदाचे उमेदवार कैलास म्हात्रे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पंकज कोरे, पूर्व मंडळ अध्यक्ष हर्षद पाटील, माजी नगरसेवक अरुण माने, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबा कदम, तेजराज हजारी, पालघर मंडळ माजी अध्यक्ष अशोक अंबुरे, युवा मोर्चा अध्यक्ष नंदन वर्तक, तसेच पालघर जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार हरिश्चंद्र भोये यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भाजपचे नगरसेवक विकासाभिमुख राजकारण करत असून, नागरिकांच्या प्रश्नांसाठी एकसंघपणे काम करतील.” तर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी आगामी काळात पालघर जिल्ह्यात भाजपची सत्ता अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाजप सरचिटणीस सुशील औसरकर यांनी केले. एकूणच, गटनेत्यांच्या घोषणेमुळे पालघर जिल्ह्यात भाजपच्या राजकीय वाटचालीला नवे बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button