मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व माझी वसुंधरा अभियान 6.0 अंतर्गत ग्रामपंचायत नावझे येथे चिल्ड्रन वॉक

 2025 प्रोजेक्ट रोशनी कंपनी व शेड संस्थेमार्फत ग्रामीण विद्यालय नावझे येथे इन बिल्ड अभ्यासक्रमासहित स्मार्ट बोर्ड 100 इंच वाले दोन स्मार्ट बोर्ड शाळेला मोफत देण्यात आले त्यामुळे ग्रामीण विद्यालयातील शिकणाऱ्या आजूबाजूच्या गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे पालघर मध्ये पहिल्यांदाच मुंबईसारख शिक्षण मिळावं या उद्देशाने हा उपक्रम पालघर मध्ये प्रथमच ग्रामीण विद्यालय नावझे हायस्कूलमध्ये राबविण्यात आलेला आहे तरी शाळेचे संस्थापक व त्यांच्या सर्व कमिटीने व ग्रामपंचायतीने सुद्धा त्यांचे आभार मानले तसेच त्यांच्याकडून सर्व मुलांना दुपारचं जेवण मोफत देण्यात आले तसेच नावझे येथील महिलांनी बचत गटाचे स्टॉल मांडण्यात आले होते व मुलांनी त्यांच्या ग्रामीण संस्कृतीचे पथनाट्य नृत्याच्या माध्यमातून कला प्रदर्शित केल्या सदरच्या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष ,सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामपंचायत अधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, बचत गट, महिला ,ग्रामस्थ, ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते सर्वांनी सदरच्या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button