मनोरच्या शिवध्येय ॲकडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात

मनोर : राजतंत्र वृत्तसेवा

पालघरपासून जवळच असलेल्या शिवध्येय ॲकडमीच्या वतीने पोलिस भरती तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १२ मे २०२६ रोजी बिरसायत भवन (मनोर) येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय पोलिस अधिकारी विकास नाईक होते. तसेच मनोर पोलीस स्टेशनचे प्रभारी आयपीएस कुमार सुशांत, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव व बिरसायत महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष संतोष जनाठे, उपाध्यक्ष दामोदर कासट, स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिवध्येय ॲकडमीचे दिग्विजय कुमावत, सुनील किरकीरा, प्रकाश जैन, संतोष शेवडे, सौ. सचिंताताई जनाठे, कुणाल बरफ यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली.

यावेळी साक्षी पाटील, स्नेहा जाधव, तनुजा हाडळ, सचिन म्हसकर, नितेश जाधव, शैलेंद्र गोवारी, आकाश भोईर, शुभम तुबंडा, दत्ता पानेरा, राहुल माळी यांच्यासह स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

विद्यार्थी आणि पालकांसह आदिवासी एकता मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुणे विकास नाईक यांनी विद्यार्थ्यांना मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. संतोष जनाठे यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा प्रवास उपस्थितांसमोर मांडत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्विजय कुमावत यांनी केले, तर साई केदार यांनी उपस्थितांचे आभार मानले. सुनील किरकीरा यांनी वंदे मातरम्‌ सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button