शिवशक्ती सेवा फाउंडेशनचे राजेश दुबे यांची माहिती
पालघर : धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उर्जेने भारलेले वातावरण अनुभवण्याची सुवर्णसंधी आता पालघरकरांना लाभणार आहे. शिवशक्ती सेवा फाउंडेशन, पालघर यांच्या वतीने दुसऱ्यांदा श्री शिवमहापुराणाचे भव्य आयोजन करण्यात आले असून, यंदा ‘बारा ज्योतिर्लिंग दर्शन’ ही विशेष आकर्षण ठरणार आहे.

६ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत माहिम रोड, साई रेसिडेन्सी हॉटेलसमोरील मैदानात हा दिव्य सोहळा पार पडणार आहे. दररोज सायंकाळी 6 ते 9 पर्यंत आचार्य प्रवर पूज्य श्री देवव्रत जी महाराज यांच्या ओघवत्या वाणीतील कथामाध्यमातून शिवमहापुराणाचे सखोल ज्ञान भाविकांना मिळणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी सुमारे २५०० भाविकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली असून, दररोज ५००० भक्तांसाठी प्रसादरूप जेवणाचीही उत्कृष्ट सोय करण्यात आली आहे. संयोजक राजेश दुबे यांनी सांगितले की, “अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते, तसेच आपल्या सनातन संस्कृतीबद्दल नव्याने आकर्षण निर्माण होते.” भक्तिभाव, अध्यात्म आणि एकतेचा संदेश देणारा हा सोहळा पालघरच्या पावन भूमीत एक नवा इतिहास घडवणार आहे. सर्व भाविकांनी या दिव्य पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे पालघरमधील तब्बल १६ सामाजिक व धार्मिक संस्थांनी एकत्र येत या उपक्रमाला भक्कम पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये राधाकृष्ण भागवत प्रचारसेवा समिती तथा खाटू श्याम संस्था पालघर, श्री खाटूश्याम सेवा संस्था मंडल पालघर, श्री राम मंदिर ट्रस्ट,पालघर, विश्व हिंदू परिषद बजरंग दल पालघर, राधाकृष्ण भागवत सेवा समिती पालघर, सार्वजनिक रामलिंग मंडल पालघर, श्री अंबे माता मंदिर ट्रस्ट पालघर, जये अंबे माता शक्ती धाम पालघर, उत्तर भारतीय नारी कला मित्र मंडल पालघर, जय मातादी चेरिटेबल ट्रस्ट उमरोली, राम भक्त हनुमान मित्र मंडल पालघर, गुजराती सेवा मंडळ आणि श्री अम्बे माता मंदिर पालघर, करणी सेना पालघर, रोनक फाउंडेशन पालघर, सकल जैन समाज पालघर, गायत्री परिवार पालघर यांचा समावेश आहे.
पत्रकार परिषदमध्ये राजेश दुबे (संयोजक), राजेश अ. तिवारी (उपाध्यक्ष), अमर वाजपेयीं, मुकेश दुबे (विश्व हिंदू परिषद), काचू शेट्टी (बजरंग दल), विजू शेट्टी, प्रभात ठाकूर हे उपस्थित होते.
