सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) ज्ञाती हितवर्धक मंडळाचा क्रीडा महोत्सव १ फेब्रुवारीला बोईसर येथे

पालघर | प्रतिनिधी

सूर्यवंशी क्षत्रिय (कुणबी) ज्ञाती हितवर्धक मंडळ, मुंबई (स्थापना १९१४) यांच्यावतीने क्रीडा महोत्सव २०२५-२०२६ चे आयोजन रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी पालघर–डहाणू तालुका क्रीडा असोसिएशन (PDTSA), बोईसर येथे सकाळी ९.३० ते सायं. ५.३० या वेळेत करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवाचे संयोजन खटाळी गटाकडून करण्यात आले असून समाजातील खेळाडू, युवक-युवती आणि कुटुंबीयांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या महोत्सवात स्व. श्री. अविनाश पांडुरंग कोरे यांच्या स्मरणार्थ व अन्यदाते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच स्व. सौ. विद्या विनोद अधिकारी यांच्या स्मरणार्थ व अन्यदाते क्रीडा मेळावा व बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा मेळावा व बौद्धिक स्पर्धांचे उद्घाटन डॉ. शशिकांत प्रभाकर वैद्य, सहाय्यक संचालक, हाफकिन संस्था, मुंबई व माजी कोरोना नोडल ऑफिसर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रदीप वैद्य (मुंबई CA) आणि उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मनीष दामोदर पाटील (कपासे) उपस्थित राहणार आहेत.

टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जेष्ठ समाजसेवक तथा रायगड सहकारी बँक लि.चे संचालक तसेच पालघर तालुका पतपेढी फेडरेशनचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर पाटील (पडघे) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी (कुडे) आणि युवा सेना पालघर जिल्हा प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश प्रकाश पाटील–(उसरणी) उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष यदुनाथ पुरुषोत्तम पाटील राहणार आहेत. क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी समाजातील सर्व खेळाडू, स्पर्धक, आजी-माजी कार्यकर्ते आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळ व संयोजक खटाळी गटाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button