मुंबई : अंकिता निमिष सावे (चौधरी) यांची भाजपा महिला मोर्चा, मुंबई प्रदेश येथे महामंत्री पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष आमित साटम आणि महिला मोर्चा मुंबई प्रदेश अध्यक्षा योजना ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आली आहे.
अंकिता सावे या लहानपणापासूनच भाजपाशी जोडलेल्या असून, त्यांनी युवामोर्चातून आपल्या राजकीय आणि संघटनात्मक प्रवासाची सुरुवात केली. बूथ स्तरापासून वॉर्ड, मंडळ, जिल्हा अशा विविध पातळ्यांवर प्रभावी काम करत त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून आता त्या प्रदेश स्तरावर जबाबदारी सांभाळत आहेत.
भाजपामध्ये संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी महामंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.सामाजिक कार्य आणि संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असून, त्यांच्या नेतृत्वामुळे महिला मोर्चा अधिक बळकट होईल आणि महिला सक्षमीकरणाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.यावेळी त्यांनी पक्षाने दिलेल्या या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, पक्षवाढ आणि समाजसेवेसाठी निष्ठेने कार्य करण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला.
