पालघर : तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 चे निकाल जाहीर झाले असून विविध गावांमध्ये सरपंच व सदस्यपदी उमेदवार विजयी झाले आहेत. या निवडणुकांमुळे संबंधित गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार डोंगरे येथे पल्लवी पुरुषोत्तम पाटील, बोर्शेती येथे बाबुराव बाबू भुतकडे, नवी देलवडी येथे स्नेहा उमेश राऊळ, तर वेंगणी येथे जगन्नाथ किसन वर्तक यांची सरपंचपदी निवड झाली आहे.
तसेच दांडी ग्रामपंचायतीत विविध प्रभागांमधून राजेंद्र सिताराम तामोरे, पूनम कळेश्वर तामोरे आणि पूनम लोकेश तामोरे यांची सदस्यपदी निवड झाली. उच्छेली येथे रवींद्र पांडुरंग नाईक, उनभाट येथे कविता प्रशांत मोरे, पाम येथे अनिता अशोक वडे, तर केळवे येथे पांडुरंग दामोदर वर्तक हे सदस्यपदी विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत सर्वसाधारण, अनुसूचित जमाती तसेच इतर राखीव प्रवर्गांमधून उमेदवार निवडून आले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध घटकांचे प्रतिनिधित्व अधोरेखित झाले आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर होताच संबंधित गावांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी विजयी उमेदवारांचे स्वागत व अभिनंदन केले. नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांकडून गावांच्या विकासासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
