जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित; २५ एप्रिल अंतिम मुदत

पालघर : राज्याचे क्रीडा धोरण-२०१२ अंतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट क्रीडापटू व क्रीडा मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तर क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला जात असताना, जिल्हास्तरावरही गुणवंत खेळाडू व मार्गदर्शकांचा गौरव करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच एक पुरुष, एक महिला व एक दिव्यांग अशा तीन क्रीडापटूंना पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व रोख १० हजार रुपये असे आहे. हे पुरस्कार 2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी दिले जाणार आहेत.

अर्जदाराने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य केलेले असावे. क्रीडा मार्गदर्शकासाठी १० वर्षांचा अनुभव व ३५ वर्षे वय आवश्यक आहे. खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले असणे गरजेचे आहे.

इच्छुकांनी अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर येथे २५ एप्रिल २०२६ पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी 9284209637, 8369752902, 9870048649, 9834090061, 8208898650 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button