पालघर : उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने “उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास” प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 20 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये 8 ते 14 वयोगटातील मुला-मुलींना प्रवेश दिला जाणार असून जिल्हा क्रीडा संकुल, पालघर येथे विविध क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण दिले जाईल.या शिबिरात देशी-विदेशी मैदानी खेळांसह बॅडमिंटन, सॉफ्टबॉल, कबड्डी, खो-खो आदी खेळांचा समावेश आहे. शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडा परिषद अध्यक्षा डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून तज्ञ प्रशिक्षकांकडून खेळाडूंना मार्गदर्शन मिळणार आहे.हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून 15 ते 20 एप्रिलदरम्यान नोंदणी करावी लागेल. सहभागी होताना 2 फोटो, आधारकार्ड, रहिवासी दाखला व बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे.संपर्क क्रमांक : गिरीश इरनक – 9284209637, अमृत घाडगे – 9870048649, मयूर खोल्लम – 9834090061, प्रीतीश पाटील – 8208898650. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांनी केले आहे.
