ठाणे, दि. ०४ (जिल्हा परिषद, ठाणे) : ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात शासनाची मान्यता न घेता काही संस्थांकडून अनधिकृतपणे खाजगी शाळा सुरू केल्याची बाब निदर्शनास आली आहे. या शाळांकडून राज्य शिक्षण मंडळ, CBSE, ICSE, IB बोर्डांच्या नावाखाली आकर्षक जाहिराती केल्या जात असून पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही याची खात्री करूनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात एकही अनधिकृत शाळा सुरू राहू नये यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ अंतर्गत अशा शाळांविरुद्ध दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील २७ अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश घेतल्यास व त्यातून शैक्षणिक नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित पालकांची राहील, याची नोंद घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच, जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पालकांनी अशा शाळां मध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घेवू नये असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अनधिकृत शाळांची यादी
पंचायत समिती अंबरनाथ – १ अनिरुध्द हायस्कूल व ज्यु.कॉलेज कुळगाव, बदलापुर, ता.अंबरनाथ. २ श्री. चैतन्य टेक्नो स्कूल, कुळगाव बदलापुर, ता.अंबरनाथ. ३ नवजीवन इंटरनॅशनल स्कूल, वांगणी (प.), ता.अंबरनाथ. ४ श्री.स्वामी समर्थ विद्यामंदिर प्राथमिक, अडीवली भाल, ता.अंबरनाथ.
पंचायत समिती भिवंडी
१ लिओ हायस्कूल काल्हेर, ता.भिवंडी.२ नॅशनल इंग्लिश स्कुल दापोडे, ता.भिवंडी.३ श्री.चैतन्य टेक्नो स्कूल सोनाळे, ता.भिवंडी.४ पाठशाळा कोचिंग क्लास, मिठपाडा, ता.भिवंडी.५ अग्नीमाता इंग्लिश स्कूल पिंपळास, ता.भिवंडी.६ मिन्हाज नॅशनल इंग्लिश स्कुल गोरसई, ता.भिवंडी.७ सुग्रा बीबी स्कूल तळवली, ता.भिवंडी.८ द विनर्स इंग्लिश स्कूल, कांबे, ता.भिवंडी.
पंचायत समिती कल्याण
१ जी.के.इंग्रजी हायस्कूल खडवली, ता. कल्याण. २ चैतन्य टेक्नास्कूल अनंततम रिजंन्सी डोंबिवली (पु.), ता.कल्याण.३ कमांडर प्रकाश इंटरनॅशनल स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज खडवली पु., ता.कल्याण.४ कायधान इंग्लिश स्कूल ,ता.कल्याण.५ ए.पी.एच.स्कूल खोणी, ता.कल्याण.६ सिम्बायोसिस स्कूल कोंढेरी, ता.कल्याण.७ एस.आर.डी.पी.स्कूल, निबंवली, ता.कल्याण.८ संभाजीराव देशमुख पब्लिक स्कूल निंबवली, ता.कल्याण.९ सेव्हन स्ट्रीम स्कूल पिसवली, ता.कल्याण.१० ओमकार इंग्लिश स्कूल पिसवली, ता.कल्याण.
पंचायत समिती शहापुर
१ श्री. शारदा इंग्लिश स्कुल शेरे, ता.शहापुर.२ न्यु इंग्लिश स्कूल (CBSE) माऊंड कार्नल स्कूल तांबडमाळ, शहापुर, ता.शहापुर.३ एम.जे.वर्ल्ड स्कूल (CBSE) तांबडमाळ, शहापुर, ता.शहापुर.४ एम.आर.प्राथमिक विद्यालय आसनगांव, ता.शहापुर.५ सौ.भावनादेवी भगवान सांबरे इंटरशनॅशनल स्कूल गोठेघर, ता.शहापुर.
“पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेताना संबंधित शाळा शासनमान्य आहे की नाही, याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. अनधिकृत शाळांकडून आकर्षक जाहिराती करून पालकांची फसवणूक केली जात आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे पालकांनी जागरूक राहून केवळ मान्यताप्राप्त शाळांमध्येच प्रवेश घ्यावा. जिल्हा परिषद ठाणेच्या कार्यक्षेत्रात अनधिकृत शाळांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले.
