क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे पुरस्कार जाहीर, आमदार प्रवीण दरेकर यांना मराठा, तर सतीश तावडे कुलभूषण पुरस्कार देऊन गौरविणार

मुंबई : 

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबई यांच्या वतीने तावडे कुळातील बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेले स्नेहसंमेलन येत्या रविवार, 8 फेब्रुवारी २०२६ रोजी दादर येथील डॉ. अॅन्टोनिया डिसिल्वा हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती अपेक्षित आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री विनोद तावडे, न्यायमूर्ती surendranath तावडे, तसेच महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. विविध पुरस्कारांचे वितरण, गौरव समारंभ तसेच प्रेरणादायी मार्गदर्शन या स्नेहसंमेलनाचे विशेष आकर्षण असणार आहे.

या शिवाय सायंकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान पारंपरिक कला, गायन व नृत्य सादरीकरणांचा ‘कलारंग’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

तावडे कुळातील सर्व बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून स्नेहसंमेलनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. समाजातील ऐक्य, संस्कृती व नातेसंबंध दृढ करण्यासाठी हे स्नेहसंमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार सन्मान

कार्यक्रमात ‘मराठा गौरव पुरस्कार’ पुरस्कार मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना प्रदान करण्यात येणार असून मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सरचिटणीस सतीश सखाराम तावडे यांना ‘कुलभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यापैकी सत्यवान सीताराम तावडे (कृषी), संतोष दिलीप तावडे (उद्योजक), डॉ. सलोनी दिलीप तावडे (क्रीडा) यांच्याबरोबरच अनिल लक्ष्मण तावडे, पूजा प्रदीप तावडे आणि सौ. श्वेता शेखर तावडे यांचा ‘आदर्श कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button