करिअर कट्टा राज्यस्तरीय अधिवेशनात सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचा सेंटर ऑफ एक्सलन्स देऊन गौरव

पालघर : उच्य व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या मार्फत शारदाबाई पवार महाविद्यालय बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघरला करिअर कट्टाचे A+ दर्जासह सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमाणपत्र व महाविद्यालयाला तीन लक्ष रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते हा प्रमाणपत्र वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय उपक्रमांचा आणि परिणामकारक कार्याचा हा अधिकृत सन्मान आहे. या राज्यस्तरीय अधिवेशनात करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांनी राबविलेल्या नवोन्मेषी कृती, करिअर मार्गदर्शन, उद्योग-शिक्षण समन्वय, कौशल्य विकास आणि विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण यांचा आढावा घेण्यात आला. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाने या उपक्रमात सातत्यपूर्ण प्रगती साधत विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिल्याबद्दल हे मानांकन प्राप्त केले असल्याचे आयोजकांनी सांगितले.

उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांना संबोधित करताना प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले की, “करिअर कट्टा हा केवळ मार्गदर्शनाचा प्रकल्प नसून ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांमध्ये करिअर जागरूकता निर्माण करणारे व्यासपीठ आहे. तंत्रज्ञान, उद्यमशीलता व कौशल्य विकास यांची सांगड घालत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम या उपक्रमातून होत आहे. ”या कार्यक्रमाला उच्य शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर तसेच महाराष्ट्र राज्य तांत्रिक सहायता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शीतोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी रोजगार बाजारातील बदलते प्रवाह, नवी तंत्रज्ञानाधारित क्षेत्रे, उद्योजकता, स्टार्टअप व उद्योग आधारित शिक्षण याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून भारत देशात कामाला सन्मान मिळत नसल्याचीही खंत व्यक्त केले.”

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा, उद्योगतज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, करिअर समुपदेशन तसेच उद्योजकता विकास कार्यक्रम राबविले जातात. या सन्मानामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयाने मिळविलेला A+ दर्जा हा विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थेसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष सी ए सचिन कोरे, प्राचार्य डॉ. किरण सावे, उपप्राचार्य प्रा. डॉ.तानाजी पोळ व डॉ. महेश देशमुख यांनी व्यक्त केली. सदरील अधिवेशानासाठी कमिटी अध्यक्ष व समन्वयक प्रा. संतोष सिरसाट, प्रा. योगिनी कोकाटे, विद्यार्थी संसदेतील मनीष चौधरी, संस्कृती तांडेल, आचल यादव आणि निर्मला राजपूत यांनी सहभाग नोंदवला. तसेच समन्वयक प्रा. तेजस चौधरी यांचेही सहकार्य लाभले. पुढील काळात आणखी नवोन्मेषी करिअर उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आ

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button