पायलट “थागवल” ॲपद्वारे बंदर परिसंस्थेमधील जहाज हालचाली आणि पायलटेज कार्यप्रवाहांचे डिजिटलीकरण
मुंबई, 07 जानेवारी 2025: भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण यांनी आपल्या सागरी संचालनाच्या एंड-टू-एंड डिजिटलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत सर्वसमावेशक, कागदविरहित हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित केली आहे.
सागरी संचालनातील विस्तृत स्वरूप आणि डेटा सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन जेएनपीएने मानक स्वरूपातील उपलब्ध उपाय स्वीकारण्याऐवजी बंदरे, जलमार्ग आणि किनारपट्टीसाठी राष्ट्रीय तंत्रज्ञान केंद्र (एनटीसीपीडब्ल्यूसी) यांच्यासोबत भागीदारी करून स्वदेशी हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करण्याचा निर्णय घेतला. ही प्रणाली जहाज वेळापत्रक नियोजन, पायलटेज माहिती, संसाधनांचे वाटप, आयओटी-आधारित इनपुट्स, सुरक्षितता निरीक्षण तसेच शाश्वतता मापन यांचा एकात्मिक समावेश करून जागतिक मानकांशी सुसंगत असा एकसंध कार्यप्रवाह प्रदान करते.
याचबरोबर जेएनपीए यांनी स्वतःची स्वतंत्र आयव्हीटीएस (इंटिग्रेटेड व्हेसल ट्रॅफिक सिस्टीम) कार्यान्वित केली असून, याआधी मुंबई पोर्ट प्राधिकरणाकडून राबविण्यात आलेल्या आणि वॉर्टसिला यांच्या सेवांवर आधारित व्हीटीएस व्यवस्थेपलीकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आयव्हीटीएस द्वारे एआयएस -आधारित जहाज माहिती संकलन आधीच सुरू झाले असून, प्रणाली पूर्णतः कार्यान्वित झाल्यानंतर ती टर्मिनल ऑपरेटर आणि सेवा पुरवठादारांना वास्तविक वेळेत कार्यरत दृश्य उपलब्ध करून देईल. यामुळे निर्णय प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक होण्यास मदत मिळेल.
या घडामोडींवर आपले मत व्यक्त करताना श्री गौरव दयाल, भा. प्र. से., अध्यक्ष, जेएनपीए, म्हणाले, “लँडलॉर्ड पोर्ट मॉडेलच्या वातावरणात पारदर्शकता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सागरी संचालनाचे डिजिटलीकरण अत्यावश्यक आहे. स्वदेशी पद्धतीने विकसित केलेली हार्बर मॅनेजमेंट सिस्टीम आणि रिअल-टाइम डेटा प्लॅटफॉर्म स्वीकारून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण सर्व टर्मिनल ऑपरेटरसाठी सेवा पुरवठा अधिक सक्षम करत असून जागतिक सर्वोत्तम पद्धतींशी सुसंगतता साधत आहे. या परिवर्तनाचे सकारात्मक परिणाम सुधारित कार्यक्षमतेच्या स्वरूपात आधीच दिसून येत असून, यामुळे बंदराची स्पर्धात्मक क्षमता आणखी वाढेल.”
पहिल्या टप्प्यातील डिजिटलीकरणाचा भाग म्हणून, मागील सहा महिन्यांपासून वापरात असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणच्या पायलट “थागवल” ॲपद्वारे आता सर्व जहाज हालचालींचा डेटा पूर्णतः डिजिटल पद्धतीने संकलित केला जात आहे. या ॲपमध्ये मास्टरच्या डिजिटल स्वाक्षरींसह संपूर्ण पायलटेज माहिती नोंदवली जाते, अहवाल निर्मितीची सुविधा उपलब्ध आहे, तसेच हे ॲप बंदराच्या बिलिंग प्रणाली (फोकस) आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक्स पोर्टल (एनएलपी) यांच्याशी एकात्मिक करण्यात आले आहे. प्रत्यक्षात माहिती नोंदविण्याची पद्धत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येत आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्याचे चाचणी प्रयोग सध्या सुरू असून, त्याअंतर्गत टग्स, पायलट लाँचेस आणि इतर नौका अशा सर्व लॉजिस्टिक साधनांपर्यंत डिजिटल डेटा संकलनाचा विस्तार करण्यात येत आहे.
जेएनपीएनी व्हीटीएस सह सर्व सागरी संचालन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोर्ट फॅसिलिटी सेंटर (पीएफसी) येथे यशस्वीपणे स्थलांतरित केले आहे. या एकात्मिक सुविधेमध्ये बंदराशी संबंधित सर्व सागरी संचालन विभाग तसेच पोर्ट हेल्थ ऑफिसर यांचे कार्यालय आणि इतर संबंधित प्राधिकरणे समाविष्ट असून, ही सुविधा १ जानेवारी २०२६ पासून पूर्णतः कार्यान्वित झाली आहे.
लँडलॉर्ड पोर्ट मॉडेलअंतर्गत कंटेनर, द्रव आणि बहुउद्देशीय टर्मिनल्सचे संचालन खासगी संस्थांकडून केले जात असले तरी, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण सर्व ऑपरेटरना सागरी सेवा पुरवण्याची जबाबदारी कायम ठेवते. बंदरात पाच कंटेनर टर्मिनल्स, दोन द्रव टर्मिनल ऑपरेटर आणि एक बहुउद्देशीय बर्थ ऑपरेटर कार्यरत असल्याने, पारदर्शक, न्याय्य आणि कार्यक्षम सागरी सेवा सुनिश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणने आपल्या सागरी संचालनाचे रूपांतर रिअल-टाइम, टाइम-स्टॅम्पयुक्त डिजिटल माध्यमावर केले असून, यामुळे प्रत्येक टर्मिनलसाठी अचूक कार्यप्रदर्शन निरीक्षण तसेच स्वतंत्र नोंद ठेवणे शक्य झाले आहे.
जनेप प्राधिकरणाबद्दल:
जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (जनेप प्राधिकरण) हे भारतातील प्रमुख कंटेनर हाताळणी बंदरांपैकी एक आहे. 26 मे 1989 रोजी स्थापना झाल्यापासून, जनेप प्राधिकरण एक बल्क कार्गो टर्मिनलवरून देशातील प्रमुख कंटेनर बंदरात रूपांतरित झाले आहे.
सध्या, जनेप प्राधिकरण पाच कंटेनर टर्मिनल्स चालवते एन एस एफ टी, एन एस आय सी टी, एन एस आय जी टी, बी एम सी टी आणि ए पी एम टी बंदरात सामान्य मालवाहतुकीसाठी उथळ पाण्याचा बर्थ देखील आहे. जनेप प्राधिकरण पोर्टवर उपस्थित असलेले लिक्विड कार्गो टर्मिनल बीपीसीएल-आयओसीएल कन्सोर्टियम द्वारे व्यवस्थापित केले जाते. या व्यतिरिक्त, नव्याने बांधलेला किनारी धक्का इतर भारतीय बंदरांना जोडतो आणि किनारपट्टीवरील कंटेनरची वाहतूक वाढवते.
277 हेक्टर जमिनीवर वसलेले, जनेप प्राधिकरण भारतातील निर्यात-केंद्रित उद्योगांना चालना देण्यासाठी, अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह, काळजी पूर्वक डिझाइन केलेले बहुउत्पादक विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) देखील चालवते.
जेएनपीए वाढवण येथे एक सर्व-हवामान, डीप ड्राफ्ट, ग्रीनफिल्ड बंदर विकसित करत आहे, जे महाराष्ट्रातील भारताचे १३वे मोठे बंदर असेल. हे जागतिक स्तरावरील सर्वोत्कृष्ठ १० बंदरांमध्ये स्थान मिळवणार आहे आणि स्थापनेपासून १००% हरित बंदर असेल.
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट आणि सोशल मीडियाला भेट द्या:
जेएन पोर्ट : www.jnport.gov.in
लिंक्डइन: JNPA- Jawaharlal Nehru Port Authority
एक्स: @JNPort
इंस्टाग्राम: @jnpaport
फेसबुक: @JNPA
मीडिया चौकशीसाठी, कृपया संपर्क साधा:
जनेप प्राधिकरण:
अंबिका सिंग
सीनियर मॅनेजर (मार्केटिंग), जनेप प्राधिकरण
मोबाईल क्रमांक: +919920372677
