पनवेल : पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीतर्फे ‘CSMU महा जॉब फेअर 2.0 – 2026’ चे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांसाठी ही मोठी रोजगार संधी ठरणार आहे. हा जॉब फेअर St. Wilfred’s Group of Colleges यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत आहे.
हा उपक्रम 29 व 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत पनवेल येथील शेडुंग परिसरात, जुना मुंबई–पुणे महामार्गाजवळ होणार आहे. या जॉब फेअरमध्ये 100 हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असून, सुमारे 2100 पेक्षा जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
विशेष म्हणजे या मेळाव्यात नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. सर्व शाखांतील महाविद्यालयीन विद्यार्थी, तसेच फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी हा मेळावा खुला आहे. मानव संसाधन, बँकिंग, फार्मा, आयटी, अभियांत्रिकी, हेल्थकेअर, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल आणि मीडियासह विविध क्षेत्रांतील संधी येथे उपलब्ध असतील.
याशिवाय ऑन-द-स्पॉट मुलाखती, करिअर मार्गदर्शन सत्रे, इंटर्नशिप संधी आणि प्री-प्लेसमेंट मार्गदर्शन यांसारख्या उपक्रमांचाही समावेश आहे.
गतवर्षी 500 हून अधिक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाल्यामुळे यंदाही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
