पालघर : राजतंत्र वृत्तसेवा
वाडा तालुक्यातील मोहोट्याचापाडा येथे ‘गांवदेवी यंग स्टार मोहोट्याचापाडा’ यांच्या वतीने भव्य शिव छत्रपती चषक 2026 ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि. 26, 27, 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 या कालावधीत उत्साहात पार पडणार आहे.
संपर्क : सौरभ पाटील 9168308889, कुणाल पाटील – 9075484206, प्रफुल्ल (बंटी) पाटील – 8999721749, अनिकेत पाटील 8698633565 यांच्याशी करावयाचा असून प्रवेश फी पहिला आणि दुसरा दिवस वाडा तालुका 5,999/-, तिसरा दिवस ओपन एक गांव एक संघ- 8,999/-, चौथा दिवस ऑल इंडिया ओपन 9,999/- अशी आहे.
ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळावे, खेळाडूंमध्ये क्रीडास्पर्धेची भावना वाढीस लागावी आणि तरुणाईला सकारात्मक दिशा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत विजेत्या संघास 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांकास 51,111 रुपये, तृतीय क्रमांकास 25,111 रुपये व चतुर्थ क्रमांकास 25,111 रुपयांचे बक्षीस आणि चारही संघांना आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज – बॅट, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांना शूज अशी विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्हद्वारे होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये विशेष उत्सुकता आहे.
प्रवेश शुल्क पहिला व दुसरा दिवस वेगळ्या दराने असून तिसर्या दिवशी ‘ओपन एक गाव एक संघ’ तर चौथ्या दिवशी ‘ऑल इंडिया ओपन’ सामने होणार आहेत. ही स्पर्धा मोहोट्याचापाडा, ता. वाडा, जि. पालघर येथे होणार असून परिसरातील क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही स्पर्धा ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी सुवर्णसंधी असून क्रिकेट रसिकांच्या मनोरंजनासाठी आकर्षित ठरेल.
-प्रतिक सुरेश पाटील, (उद्योजक,मोहोट्याचापाडा)
