सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातर्फे महारोजगार मेळाव्याचे आयोजन, कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध

पालघर : 

कौशल्य प्राप्त केल्यास तरुणांना रोजगार मिळविणे अवघड नाही, असे विचार सीआयआयच्या कांदिवली येथील सेंटरचे प्रमुख दयाळ कांगणे यांनी काढले. सोनोपंत दांडेकर महाविद्यालय व कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जानेवारी २०२६ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महारोजगार मेळाव्यामध्ये सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, मुक्त विद्यापीठ व पालघर परिसरातील इतर तरुणांनी सहभाग नोंदवला. जवळपास १७०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या महारोजगार मेळाव्यासाठी आपली नोंदणी केली. या महारोजगार मेळाव्यामध्ये ३० कंपन्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ४६४५ इतक्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. या मेळाव्यामध्ये ५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व त्यापैकी १२४ विद्यार्थ्यांचे जॉब सिलेक्शन करण्यात आले. ३६७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली व १३७ विद्यार्थ्यांना स्कील डेव्हलपमेंट करण्याचे सांगण्यात आले.

त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप आणि इतरही स्वयंरोजगारी रोजगाराच्या संधीबद्दल या ठिकाणी माहिती घेतली. ॲमेझॉन, बजाज, आयटीसी, एचडीएफसी यासारख्या नामांकित कंपन्या या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या आणि यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकरा हिंदू मिशन, माटुंगाचे हरी कलपते यांचे मौलिक मार्गदर्शन व योगदान लाभले. 

या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना संस्थेचे अध्यक्ष सी.ए. सचिन कोरे यांनी बदलत्या काळात विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी या संधींचा वापर करावा व रोजगाराच्या संधी प्राप्त कराव्या. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ग्रामीण विकास केंद्राचे संचालक डॉ. कैलास मोरे व मुक्त विद्यापीठाचे मुंबई विभागीय संचालक वामन नाखले उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

हा कार्यक्रम जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा यासाठी महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर सहकाऱ्यांचा विशेष सहभाग होता. त्याचप्रमाणे सी.आय.आय. च्या दयाळ कांगणे, सी.आय.आय. एम.सी.सी. च्या निलेश धनावडे, गौरांग खाड्ये, सिद्धेश राजपुत, रवी कुमारिया, गौरव मणियार, राजेश वासमवार, मानसी चव्हाण यांचा सहभाग होता.

Share Options

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button