सहावी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिपचा पनवेल येथे समारंभ,
सहा राज्याच्या ३२० खेळाडूंनी घेतला होता सहभाग
अलिबाग :
अलिबागमधील जपान शिटोऱ्यू कराटे डॉ, इंडिया संघाच्या १५ कराटेपटूंनी क्योशी राहुल श. तावडे (८ डॅन ब्लॅक बेल्ट, जपान) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वात जास्त १३ सुवर्णपदक मिळवण्याचा व ६ वा सोके चॅम्पियनशिप -२०२६ कप पटकावण्याचा मान मिळवला.
विजेत्यांची नावे खालील प्रमाणे आहेत, ओवी गायकर (कटा – सुवर्ण), कुमिते – सुवर्ण, श्रीयांस तावडे (कटा – सुवर्ण), कुमिते – सुवर्ण, मुमुक्षा घरत (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), सार्थक मोरे (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), रजाक मुजावर (कटा – कांस्य, कुमिते – सुवर्ण, रुद्र नाईक (कटा – रौप्य), कुमिते – सुवर्ण, श्रीनिष मढवी (कटा – कांस्य, कुमिते – सुवर्ण) हर्षाली जाधव (कटा – रौप्य, कुमिते – सुवर्ण), त्रीश सुतार (कटा – रोप्य, कुमिते – रोप्य), हुनर जैन (कटा – रोप्य, कुमिते – कांस्य), युवराजसिंग दसाना (कटा – कांस्य, कुमिते – कांस्य), स्वरूप दडस (कटा – कांस्य, कुमिते – कांस्य), काव्या तुपट -(कुमिते – कांस्य), स्वरांगी दडस – कुमिते – कांस्य, तनिष्क तावडे (कुमिते – सुवर्ण) या कराटेपटूंचे अलिबागमध्ये सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
